जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कडवई चा गौरव
आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार

प्रतिनिधी -शाहिद अहमद तुळवे
दि एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित महाराष्ट्र उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई या प्रशाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांचा देवरुख येथे नुकत्याच झालेल्या संगमेश्वर तालुका आमसभेत आमदार शेखर निकम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रशालेचे प्रिन्सिपल रिजवान कारीगर यांच्या नेतृत्व आणी मार्गदर्शनाखाली वरिष्ठ शिक्षक जावेद दखणी, नर्गिस तुळवे, नुजहत बागलकोटे, तौफिक शेख, रिदवान काद्री, इम्रान कापडे, सुमय्या खान, साक्षी खांबे, ज्युनिअर कॉलेजचे वाईस प्रिन्सिपल परांजल मोहिते, तसेच कला शिक्षक विशाल धनावडे, करिना वागळे, निहा मॅडम, फिजा मॅडम, सुमय्या मॅडम व प्रतिक्षा मॅडम यांनी सातत्याने मेहनत घेतली. शिक्षकेतर कर्मचारी नदीम मस्तान, दस्तगीर मुल्लाणी आणि प्रशांत कांबळे यांचे योगदानही विशेष ठरले.
संस्थेचे अध्यक्ष सादीक काजी व उपाध्यक्ष डॉ. अन्सार जुवळे यांच्यासह सर्व संस्था सदस्यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच जमातुल मुस्लीमीनचे अध्यक्ष सिकंदर जुवळे व सदस्यांनीही मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या सत्कारामुळे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली असून, पुढील काळातही आणखी उत्कृष्ट कामगिरी करून कडवईचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे




