महाराष्ट्र

प्रख्यात धर्मगुरू शेख अब्दुल वाहिद तथा अन्वर युसूफी यांचे निधन

मुंबई दफन विधी : अंत्ययात्रेस मोठी गर्दी

 

प्रतिनिधी- शाहिद अहमद तुळवे

कोकणातील प्रख्यात धर्मगुरू, कवी, साहित्यिक व समाजसेवक शेख अब्दुल वाहिद अन्वर युसुफी यांचे २९ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई येथे निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.

शेख युसुफी हे जिल्हा जमीयत अहले हदीस, रत्नागिरीचे अध्यक्ष तसेच मरकजुद-दावा अल-इस्लामिया वल-खैरिया, सवनस (ता. खेड़) या संस्थेचे संस्थापक-संचालक होते. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी केली.

  • मुंबईत त्यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी जमली. त्यांच्या निधनाने कोकणासह देशभरातील धार्मिक व शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात सुपुत्र शेख मुजाहिदुल इस्लाम व असंख्य विद्यार्थी त्यांचा कार्यवारसा पुढे नेणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!