धामणवणे येथील नळाच्या पाण्याला प्रेशर कमी
वाशिष्टी पुलाच्या जॅकवेल जवळ चिखल काढून बंधारा बांधावा- शौकतभाई मुकादम यांची मागणी

*🟣 चिपळूण उपनगर व धामणवणे येथील नळाच्या पाण्याला प्रेशर कमी वाशिष्ठ पुलाच्या जॅकवेल जवळ चिखल काढून बंधारा बांधावा : शौकतभाई मुकादम*
*चिपळूण :* बहादुरशेख वाशिष्टी पुलाजवळ चिपळूण नगर नगरपरिषदेचा जॅकवेल आहे.या ठिकाणी कच्चा बंधारा बांधण्यात आला होता तो वाहून गेल्यामुळे चिपळूण उपनगर मध्ये धामणवणे गावांमध्ये नळाचे पाणी कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत तसेच त्या ठिकाणी चिखल साठला आहे सदरच्या माळेवाडी जॅकवेल चा चिखल काढून त्या ठिकाणी कच्चा बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. शौकतभाई मुकादम यांनी चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
ते पुढे म्हणाले की पाण्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असल्याने यामध्ये नगरपरिषदेने तातडीने लक्ष घालावे नाहीतर नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल असेही श्री. मुकादम म्हणाले.




