महाराष्ट्र
कळंबस्ते रेल्वे फाटकात पुन्हा तांत्रिक बिघाड : ट्रॅफिक जॅम
अपघात वगैरे घडल्यास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील : शौकतभाई मुकादम यांचा इशारा

कोकण रेल्वे मार्गावरील कळंबस्ते येथील रेल्वे फाटकातील तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरूच आहे.मंगळवार १२ वाजण्याच्या सुमारास फाटक असे अडकले होते बराचवेळ ट्रॅफीक जॅम.या फाटकाची तातडीने दुरुस्ती करावी.जर का दुरुस्ती अभावी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कोकण रेल्वे प्रशासनाची राहील अशी प्रतिक्रिया *शौकत मुकादम* यांनी दिली.आहे ते पुढे म्हणाले की कळंबस्ते येथे रेल्वे फाटक असल्याने तेथे उड्डाण पूल बांधण्याची मागणी केल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.या फाटकामुळे वाहनचालकासह ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे




