रेल्वे सुरक्षा दल ॲक्शन मोड मध्ये
कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांच्या मागणीला यश

चिपळूण:मुंबईकडे जाणाऱ्या व तिकडून येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे दरवाजे आतून बंद केले जातात,त्यामुळे चिपळूणमध्ये आरक्षणाची तिकीट असणाऱ्या प्रवाशांनासुद्धा आतमध्ये बसता येत नाही.त्यामुळे आरक्षित केलेल्या लोकांचे पैसे नाहक फुकट जात आहेत.याची चौकशी व्हावी व रेल्वे डब्यांचे दरवाजे आतून बंद करणाऱ्यांवर रेल्वे आर.पी.एफ पोलिसांनी कार्यवाही करावी,अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष *शौकत मुकादम* यांनी केली होती.त्या पार्श्वभूमीवर रेल्वे आरपीएफ रेल्वे डब्यांमध्ये चिपळूण रेल्वे स्थानकावर जागरूकता मोहीम राबवली.*प्रवाशांना सुरक्षित आणि कायदेशीर प्रवास पद्धतींबद्दल जागरूक करण्यात आले.चिपळूण ट्रेनमध्ये आरक्षण तिकिटे असतानाही प्रवाशांना जागा नाकारल्या जात असल्याबद्दल अनधिकृत व्यक्तींकडून राखीव जागांवर बेकायदेशीरपणे कब्जा करणे.वापरकर्त्याने स्टेशनवर किंवा अधिकृत माध्यमांद्वारे रेल्वे संरक्षण दल (RPF) कडे तक्रार दाखल करावी असे शौकत मुकादम यांनी सांगितले आहे*




