महाराष्ट्र
रिक्टोली गावचे कोतवाल गणपतराव शिंदे यांचे दु:खद निधन
रिक्टोली स्मशानभूमीत शुक्रवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार

प्रतिनिधी – डॉ.सुनिल सावंत
पिंपळी (चिपळूण):रिकटोली गावचे रहिवासी व तिवरे गावचे कोतवाल म्हणुन गेली अनेक वर्षे अत्यंत चांगले काम करून गोरगरिबांना महसुल विभागातील काही अडचणी आल्यास त्या दूर करण्यात ज्यांची ख्याती होती, ते गणपतराव रघुनाथराव शिंदे यांचे निधन आज गुरूवार २० नोव्हेंबर रोजी झाले.
त्यांचे अंत्यसंस्कार विधी रिकटोली स्मशानभूमीत शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.




