महाराष्ट्र
चिपळूण न.प.च्या नवीन इमारतीसाठी ३० कोटींचा निधी मिळावा: तळे विकसित करण्या बरोबरच पुराची तीव्रता कमी करण्यासाठी संरक्षण भिंती बांधण्यासाठी निधी मिळावा : लाल-निळी पूररेषा रद्द व्हावी
आमदार शेखर निकम सर यांनी मांडले हिवाळी अधिवेशनात अभ्यासपूर्ण मुद्दे

-
मोडकळीस आलेल्या चिपळूण नगर परिषदेच्या नवीन इमारतीसाठी ३० कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात करताना प्रलंबित विकासकामांच्या मुद्यांना हात घातला. निकम यांच्या अभ्यासपूर्ण मुद्दयांबाबत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे. आ. शेखर निकम यांनी पहिल्या टर्ममध्ये अधिवेशनात चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांसाठी आवाज उठवित निधी मिळविला. तर आता दुसऱ्या टर्ममध्येदेखील उर्वरित प्रश्नांसाठी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे.
आता नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात आ. शेखर निकम यांनी आपले म्हणणे मांडताना मुंबई-गोवा महामार्गांची मध्यभागी वेगाने विकसित होत असलेले १५० वर्षांचा गौरवशाली इतिहास जपणारे म्हणून चिपळूण शहराची ओळख आहे. ब्रिटिशकालीन चिपळूण नगरपरिषदेच्या इमारतीची दुरावस्था
झाली असल्याने नव्या इमारतीसाठी ३० कोटींच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी यावेळी केली. तर चिपळूण दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी इमारतीच्या निधीच्या मंजुरीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव लवकर मंजूर होणे हे शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आ. निकम यांनी यावेळी नमूद केले. तसेच चिपळूण शहरासाठी १५३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीबद्दल निकम यांनी यावेळी सभागृहात शासनाचे आभार व्यक्त केले. तर ते पुढे महणाले की, चिपळूण शहराची तळ्यांचे शहर महणून ओळख आहे.
पूर्वी काही तळे विकसित झाले आहेत. तर अजूनही काही तळे विकसित होणे गरजेचे आहे. या तळ्यांच्या विकसीकरणा बरोब् रच सुशोभिकरणासाठी निधी मिळावा, अशी मागणी केली. चिपळूण शहराला अनेक वेळा पुराचा फटका बसला आहे. या पुरापासून संरक्षण मिळावे, यासाठी संरक्षक भिंतीची गरज आहे.
नलावडा बंधारामुळे या वर्षी पुराची तीव्रता कमी झाली असल्याचे नमूद करून संरक्षक भिंतींसाठी निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. चिपळूण शहरात जुलै २०२१ रोजी आलेल्या महापुरानंतर लाल-निळी पूररेषा लादण्यात आली आहे. या रेषांमुळे चिपळूण शहराचे मोठे नुकसान होत आहे. ही रेषा रद्द व्हावी, यासाठी आपण अधिवेशनांमध्ये अनेक वेळा आवाज उठवलेला आहे. यासंदर्भात कार्यवाही केली जाईल असे सांगण्यात आलेले आहे. परंतु, अजूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. तरी यावर लवकरच निर्णय व्हावा, अशी आग्रही मागणी आमदार शेखर निकम यांनी यावेळी केली. *तसेच देवरुखमधील देखील काही प्रलंबित प्रश्नांकडे अधिवेशनाचे लक्ष वेधले. आ. शेखर निकम मांच्या अभ्यासपूर्ण मुद्दयांबाबत चिपळूण- संगमेश्वरवासियांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.




