
साखरतर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.अझिम कोतवडेकर सर शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात परिश्रम, प्रामाणिकपणा आणि समर्पण यांचे उत्तम उदाहरण ठरलेले सर ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी आपल्या सेवेचा सुवर्ण अध्याय संपवून सन्मानपूर्वक निवृत्ती झाले.
साखरतर हायस्कूल, रत्नागिरी येथे तब्बल ३४ वर्षे आणि ४ महिने त्यांनी शिक्षणसेवा करत शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानदीप प्रज्वलित केला. हा काळ केवळ नोकरीचा नव्हे, तर सेवेचा, संस्कारांचा आणि शिक्षणधर्माचा अखंड प्रवास होता.
अझीम सरांनी केवळ अध्यापनच केले नाही, तर नेतृत्व, मार्गदर्शन आणि प्रेरणा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून शिक्षणव्यवस्थेला नवे आयाम दिले.
परीक्षक, नियंत्रक, मुख्य नियंत्रक, पेपर सेटर, रिसोर्स पर्सन, चिप कंडक्टर,बिल्डिंग कंडक्टर अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी नेहमीच काटेकोरपणे आणि निष्ठेने पार पाडल्या.
त्यांच्या कामगिरीची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली —
१९९९ आणि २००० मध्ये कोकण टॅलेंट फोरमचा “सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार”
२०१४ मध्ये “हिंदी आदर्श सेवा सन्मान” — या गौरवांनी त्यांच्या तेजात आणखी भर घातली.
महाराष्ट्र छत्र सेना (एम.सी.सी.) मध्ये त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि आत्मविश्वासाची जाणीव निर्माण झाली.
अझीम सर म्हणजे ज्ञानप्रेम, शिस्त, नम्रता आणि विद्यार्थ्यांविषयी माया — या सर्व गुणांचा संगम. त्यांच्या करुणा आणि मार्गदर्शनाने असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उजळले.
त्यांची निवृत्ती हे केवळ एका शिक्षकाचे औपचारिक समारोप नव्हे, तर शिक्षणजगतातील एका सुवर्ण पर्वाचा सन्माननीय पडदा आहे.अशा गुणी सरांना शुभेच्छा देण्यासाठी *मिस्त्री हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री इक्बाल हुनेरकर सर* आपल्या कुटुंबासहीत त्यांच्या घरी गेले.
अल्लाह तआला त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि शांत, समाधानमय जीवन प्रदान करो.




