महाराष्ट्र

ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणी चा शुभारंभ

संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन

कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या मांडकी पालवण येथील भव्य क्रीडांगणावर शासन पुरस्कृत, राज्यस्तरीय ग्रामीण,कृषी व सहकार साहित्य संमेलनाचे मंडप उभारणीचा उद्घाटन सोहळा आज गुरुवार दि.५.२.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता संयोजन समितीचे अध्यक्ष श्री प्रकाशजी देशपांडे यांचे शुभहस्ते संपन्न झाला. सदर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे,प्रमुख कार्यवाह डॉ. निखिल चोरगे, स्मरणिका छपाई समिती अध्यक्षा सौ. अंजली चोरगे,कोषाध्यक्ष श्री अजय चव्हाण, साहित्य संमेलनाच्या प्रसिद्धी व प्रचार समिती प्रमुख डॉ. शमिका चोरगे, संस्थेचे सचिव श्री मिलिंद सुर्वे, प्राचार्य डॉ.संकेत कदम,प्राचार्य सचिन तांबेकर व रावसाहेब सुर्वे उपस्थित होते.

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!