खेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय
विजयी नगरसेवकांचा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला सन्मान

खेड -खेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीने विरोधकांचा पराभव करत २१ पैकी २१ जागांवर दणदणीत विजय मिळवला. या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विजयी नगरसेविका सौ वैभवी वैभव खेडेकर, रहीम सहीबोले व स्वप्नाली चव्हाण यांनी काल माजी नगराध्यक्ष व भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच खेड नगरपरिषदेच्या विकास कामांबाबत, लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शक कारभार आणि भविष्यातील विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा केली. यानंतर सर्वांनी शिवसेना नेते माझी पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी रामदास भाई कदम यांनी भाजपच्या विजयी नगरसेवकांचा विशेष सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महायुतीच्या एकजुटीमुळेच हा ऐतिहासिक निकाल शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच खेड नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांच्या हिताचे, विकासाभिमुख आणि पर्यावरण पूरक निर्णय घेतले जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




