Uncategorizedमहाराष्ट्र
कुटरे येथील पीर हजरत शाह इब्राहिम कादरी यांचा आज संदल तर उद्या 4 तारखेला उरूस
शिवकालीन वारसा असलेली दर्गाह

कुटरे,ता.चिपळूण, जि.रत्नागिरी येथील पीर हजरत शाह इब्राहिम काद्री रह. अलै.यांचा उरूस आज दि. 3 जानेवारी व उद्या दि.4 जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. आज रात्री ईशाच्या नमाजनंतर रात्री 9 वा. संदलचा कार्यक्रम होईल .उद्या उरूस साजरा करण्यात येईल. रात्री 8.30 नंतर नियाज व त्यानंतर निशाण मिरवणूक काढून उरूसाची सांगता होईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन दर्गा मुजावरांकडून करण्यात आले आहे. कुटरे हे गाव मुंबई गोवा हायवेवरील असुर्डे गावापासून 15 कि. अंतरावर असून या गावाला व येथील दर्ग्याला शिवकालीन ऐतिहासिक वारसा आहे



