वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत हाजी एस.एम. मुकद्दम हायस्कूलचे सुयश
दोन विद्यार्थिनी सिल्वर मेडलच्या मानकरी

खेड -(मोहम्मद समी मोमीन)
अंजुमन-ए-तालीम खेड संचलित हाजी एस.एम. मुकद्दम हायस्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित ६ किलोमीटर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचे नाव उज्वल केले आहे. या स्पर्धेत शाळेच्या ५० विद्यार्थिनी आणि दोन शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.
विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनीं मध्ये बुरुंडकर झोवेरिया हनीफ हिने पाचवे स्थान पटकावले, सर खान फरहीन जावेद हिने सातवे प्राप्त केले. या दोघींना सिल्वर मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या मॅरेथॉन मध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व युवकांचे मनोबल वाढवले व त्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक हसनमियां रिफाई यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करताना सांगितले की,”आम्ही एकत्र धावतो, आम्ही एकत्र जिंकतो. हे आमच्या विद्यार्थिनींनी कृतीतून दाखून दिले आहे.शाळा शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही प्रगती करत राहील.
या गौरवशाली यशाबद्दल अंजुमन-ए-तालीम खेड संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.




