महाराष्ट्र

कुलसूम मुनीर फाउंडेशन व शब्बीर लालू शेख यांच्यातर्फे शाळांना संगणक भेट

शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती ने मानले आभार

पुणे-

आज दिनांक २५ जून २०२६ रोजी, कुलसूम मुनीर फाउंडेशन तसेच श्री. शब्बीर लालू शेख यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद उर्दू शाळा, नारायणगाव क्र. ३, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या शाळेस दोन संगणक भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यास मोठी मदत होणार असून शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांनी कुलसूम मुनीर फाउंडेशन व श्री. शब्बीर लालू शेख यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

याच प्रसंगी वारूळवाडी केंद्राचे नवनिर्वाचित केंद्रप्रमुख मा. श्री. माजिद सर यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाबद्दल सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन व आभार.

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!