महाराष्ट्र

राधाताई लवेकर यांची श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थेच्या सभासद पदी निवड

शुभेच्छांचा वर्षाव

राधाताई लवेकर यांची श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थेच्या सभासदपदी निवड

चिपळूण : सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या राधा ताई लवेकर यांची श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान (गोशाळा), ता. खेड, जि. रत्नागिरी यांच्या सभासदपदी निवड करण्यात आली आहे. संस्थेने दिलेल्या नियुक्तीपत्रानुसार, राधा लवेकर यांनी अनेक वर्षांपासून संस्थेशी जुळवून ठेवलेले संबंध, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग आणि समाजसेवेप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेऊन त्यांना सन्मानपूर्वक सभासदत्व प्रदान करण्यात आले आहे.
या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, भविष्यातही त्या संस्थेच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!