महाराष्ट्र

द असोसिएशन फॉर सीनियर सिटीजन मँगो गार्डन बेलापूरचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

उपस्थित मान्यवरांनी केले कार्यक्रमाचे कौतुक

दिनांक- ३१/०५/२०२६ या दिवशी अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या सहकार्याने द. असोसिएशन फॉर सिनियर सिटीझन मँगो गार्डन बेलापूरचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्सहात पार पडला. या कार्यक्रमात अपोलो हॉस्पिटल चे प्रमुख पाहुणे डॉ.अनन्या मिश्रा, डॉ. रितुपर्णा घोष,डॉ.विशाल चफाले, सिनियर सिटीझन मंगो गार्डन च्या अध्यक्ष सौ. लता प्रकाश पोवार, श्री .विलास बर्वे आणि श्री. थाँमास यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच श्री अण्णासाहेब टेकाळे( फेस्कॉम महाराष्ट्र अध्यक्ष ) यांनी देखील कार्यक्रमात हजेरी लावली.उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी सिनियर सिटीझन यांनी ५५ वयानंतर आपल्या शरीराची कशी दक्षता घ्यावी या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.
सिनियर सिटीझन च्या अध्यक्ष सौ. लता प्रकाश पोवार यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे श्री अण्णासाहेब टेकाळे( फेस्कॉम महाराष्ट्र अध्यक्ष ) पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरवात करण्यात आली . त्यात अदालत ह्या नाटकाला जास्त प्रशंसा करण्यात आली. ह्यात विविध प्रकारचे नृत्य ,गायन, शोर्ट फिल्म ( रील्स) वाद्य वादन करून प्रत्येकांनी आप आपले कलागुण सादर केले.अपोलो हॉस्पिटल तर्फे देखिलउत्कृष्ट कलागुण सादर करण्याऱ्या सदस्यांना सम्मान चिन्ह देण्यात आली. त्यात उत्कृष्ट महिला कलागुण पारितोषिक सौ. लता प्रकाश पोवार , उत्कृष्ट वाद्य वादन श्री. गोपाल पात्रो , उत्कृष्ट जोडी (performance) श्री. आणि सौ. बब्बर यांना देण्यात आले. कार्यक्रमास सफल करण्यात अपोलो हॉस्पिटल चे कर्मचारी श्री.प्रकाश वाडकर, श्री.अनिल साहू, कु. प्रणाली कुऱ्हाडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. सगळ्यांचे आभार व्यक्त करून चहा नाष्ट्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!