महाराष्ट्र

शिरळ गावचा सुपुत्र फारुक शिरळकर ‘इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट ‘ परीक्षेत देशात प्रथम

सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

चिपळूण : तालुक्यातील शिरळ गावच्या फारूख लियाकत शिरळकर याने शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत गौरवास्पद कामगिरी करत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. फारूखने ‘आयसीएआय’ची (ICAI) ‘इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट’ (INTT-AT) संपूर्ण भारतभरात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे. एका लहानशा गावातून आपल्या शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या फारूखने आपल्या मेहनत, चिकाटी आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर हे उत्तुंग यश संपादन केले आहे.

फारूखचे हे यश केवळ शिरळ गाव किंवा एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित नसून, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. यापूर्वी २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात त्याने ‘चार्टर्ड अकाउंटंट’ (CA) ही पदवी प्राप्त केली होती आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावून त्याने आपल्या प्रगतीचा आलेख अधिक उंचावला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल फारूख शिरळकर, त्याचे वडील लियाकत शिरळकर, आई खतिजा शिरळकर आणि संपूर्ण शिरळकर परिवारावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, फारूखच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!