महाराष्ट्र
आंबा बागायतदार व पर्स बागायतदार नुकसानीचे पंचनामे होऊनही अजून भरपाई नाही,हे कितपत योग्य आहे?-शौकतभाई मुकादम
आंबा बागायतदार व पर्स बागांमध्ये हवामानाच्या वातावरणामुळे आंबा ,काजू यांचे नुकसान झाले. त्याचे पंचमानेही करण्यात आले, परंतु आजतागायत त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. हे बागायतदारांची समजूत करण्यासाठी पंचनामे करण्यात आले का?असा प्रश्न चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत भाई मुकादम यांनी उपस्थित केला आहे.*
*व ते पुढे म्हणाले की, बागायतदार व पर्स बागामध्ये असणारी हापूस आंब्याची पाच दहा कलमे यांना पावसाळी भरणी करून खत टाकावे लागते. याकरिता संबंधितांना आता शासनाच्या मदतीची गरज आहे. वेळ निघून गेल्यावर मग त्याच काय उपयोग? असेही मुकादम म्हणाले.*




