महाराष्ट्र

संजय काशिद यांची ‘ पर्यटन व्यवसायिक महासंघ कोकण’च्या संघटक पदी नियुक्ती

मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

चिपळूण / प्रतिनिधी:
पर्यटन व्यावसायिक महासंघ कोंकण तर्फे संघटनेच्या विस्तार आणि बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. महासंघाच्या ‘संघटक – कोंकण पर्यटन विभाग’ या अत्यंत महत्त्वाच्या पदावर श्री. संजय काशिद यांची सर्वानुमते व श्री विष्णु (बाबा) मोंडकर राष्ट्रीय अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे.
कोंकणच्या पर्यटन क्षेत्राचा विकास करणे आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लावणे या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. संजय काशिद यांचा पर्यटन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि सामाजिक व राजकीय कार्यातील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
कोकणातील पर्यटन क्षेत्राला अधिक संघटित करून जागतिक स्तरावर नेण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘पर्यटन व्यावसायिक महासंघ कोंकण’च्या (Konkan Paryatan Vyavsayik Mahasangh) कोंकण पर्यटन विभाग संघटक या अत्यंत जबाबदारीच्या पदी श्री संजय काशिद यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कोकणातील पर्यटन उद्योगात आनंदाचे वातावरण असून, पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
श्री संजय काशिद हे स्वतः एक अनुभवी पर्यटन व्यावसायिक आणि ‘तनय ड्रिमवर्ल्ड टुरिझम’चे संचालक आहेत. याआधीही त्यांनी महासंघाचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक म्हणून अत्यंत यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली असून, पर्यटन वाढीसाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. दापोलीसहित संपूर्ण कोंकणात पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
आपल्या या नवीन जबाबदारीबाबत बोलताना श्री. काशिद यांनी महासंघाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. तसेच, आगामी काळात कोंकणच्या निसर्गसंपन्न पर्यटनाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी आणि स्थानिक होमस्टे, रिसॉर्ट्स व इतर पर्यटन पूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”कोंकणातील पर्यटन व्यवसायात अपार संधी आहेत. स्थानिक संस्कृती, जलपर्यटन आणि ऐतिहासिक वारसा यांचा मेळ घालून कोकणाला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवण्यासाठी आमचा महासंघ कटिबद्ध आहे. सर्व पर्यटन व्यावसायिकांना एकत्र आणून त्यांच्या समस्या सोडवणे आणि पर्यटकांना उत्तम अनुभव देणे ही माझी प्राथमिकता असेल.” तसेच खेड तालुका विशेष करून पर्यटन विकासाच्या प्रतिक्षेत आहे तिथेही या विकास कामांचे नियोजन लवकरच सुरू करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे कोकणच्या पर्यटन विकासाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास महासंघातील इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. श्री. संजय काशिद यांच्या या नियुक्तीबद्दल कोंकणभरातील पर्यटन व्यावसायिक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!