महाराष्ट्र

पाटपन्हाळे गाव चे सामाजिक कार्यकर्ते गणपत कदम यांचे निधन

दिनांक २१ जून रोजी श्रद्धांजली कार्यक्रम

पाटपन्हाळे गावचे सामाजिक कार्यकर्ते गणपत कदम यांचे निधन

प्रतिनिधी (मंगेश जाधव)-गुहागर तालुक्यातील बौध्दजन सहकारी संघ पाटपन्हाळे शाखा क्र. 11या शाखेचे माजी सल्लागार दि. गणपत भिकू कदम यांचा वयाच्या 75व्या वर्षी दु:खद निधन झाले. ते 1988च्या शतकात मिलकामगार असताना त्यांनी आपल्या तीन मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले मोठे चिरंजीव प्रकाश हे इन्कम टँक्स क्षेत्रात अधिकारी असुन दुसरे चिरंजीव खाजगी नोकरी करत आहेत. गणपत कदम यांचा गावाच्या सामाजिक शैक्षणिक प्रगती मध्ये मोलाचा वाटा असायचा अत्यंत मनमिळावू आणि कार्यतत्पर म्हणून त्यांनी आपली समाजात ओळख निर्माण केली. त्यांच्या पश्चात भाऊ. बहीण. मुलगे मुलगी. जावई. नातवंडे पत्नी असा मोठा परिवार आहे त्यांचा जलदान विधी व शोकसभा कार्यक्रम रविवार दि. 21/6/2026रोजी सकाळी 10वा. त्यांच्या राहात्या घरी मु. पो. पाटपन्हाळे (कदमवाडी)ता. गुहागर या ठिकाणी होणार असुन सर्व दुखीत बांधवानी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहावे असे शाखेचे अध्यक्ष प्रकाश कदम यांनी विन्रम आवाहन केले आहे.

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!