महाराष्ट्र

हातखंबा येथे डंपर पलटी होऊन चालक जखमी

सुदैवाने जीवितहानी नाही

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा येथील उतारावर गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास डंपर खड्ड्यात पडून अपघात झाला. या दुर्घटनेत डंपर चालक किरकोळ जखमी झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की, पालीहून रत्नागिरीकडे जात असलेला डंपर हातखंबा दर्ग्याजवळ आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे डंपर विरुद्ध दिशेला जाऊन उजव्या बाजूच्या खड्ड्यात पलटी झाला. अपघातात चालक थोडक्यात बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतीसाठी पुढाकार घेतला. संबंधित यंत्रणांकडून अपघातस्थळी योग्य ती कार्यवाही करण्यात आली.

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!