महावितरण कंपनीने स्मार्ट मीटर संबंधी हिटलर शाही बंद करावी अन्यथा आंदोलन छेडणार- रफीक मोडक
व्हाट्सअप वरून येणाऱ्या मेसेज बद्दल नाराजी

चिपळूण –
महावितरण कंपनी एक खाजगी कंपनी असून आपण सरकारी कंपनी,सरकारची मालमत्ता लोकसेवक असल्याचा आव आणून सरकारच्या संरक्षणाखाली हिटलरशाही पद्धती वापरून देशभरातील लोकांचा विरोध असताना जनतेचे हित जनतेचे मत डावलून केवळ अदानीच्या फायद्यासाठी सध्या सरकारच्या मदतीने लोकांना हुकुमशासारखे मेसेज येत आहेत की आम्ही 48 तासात जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर देणार आणि यांना विरोध करणाऱ्या ना सरकारी कामात व्यत्य आणला म्हणून दहा हजार रुपये दंड किंवा तीन महिने कारावास देणार अशी भीती दाखवण्याचे जुलमी काम करण्यात येत आहे यावरून लोकांना सध्याच्या सरकार पेक्षा इंग्रजी राजवट बरी होती अशी भावना होत आहे म्हणजेच अदानी, अंबानी, मोदी या चार पाच लोकांच्या फायद्यासाठी 150 कोटी लोकांवर हे सरकार अन्याय ,अत्याचार करण्यास तयार आहे कारण या सरकारचा जनतेवर विश्वास नाही तर ती EVM वर आहे आमचे आत्ताचे निवडून आलेले काही लोकप्रतिनिधी ही महावितरण कंपनीचे समर्थन करत आहे तरी महावितरण कंपनीने जबरदस्तीने दांडगेशाही पद्धतीने काढलेले फर्मान मीटर बदलीचे मागे घ्यावेत आपले मीटर मोबाईल चार्जरला पण धावतोय मीटर बदलण्यापूर्वी आपण गावागावात ग्रामपंचायतच्या ठिकाणी महिना महिना वीज वापर व रीडिंग याचे डेमो दाखवावेत व लोकांच्या शंका दूर कराव्यात आणि मगच फर्मान काढावा
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपाती यांनी अदानी ग्रुपचे 20000 करोडची स्मार्ट मीटर रद्द केले महाराष्ट्र सरकारने या प्रकारचे कारवाई करून सर्व स्मार्ट मीटर रद्द करून जनहिताचा निर्णय घ्यावा आत्ता जर महावितरण कंपनीमार्फत अदानी ग्रुपने जोर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बदलण्याचा प्रयत्न केल्यास इंदिरा काँग्रेस तर्फे रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व वक्ता सेल चे जिल्हाध्यक्ष श्री रफिक मोडक यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्या सर्वास विभागीय कंपनी व सरकार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे रफिक मोडक यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे




