महाराष्ट्र

महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कडवई मध्ये हिंदी दिवस साजरा : विद्यार्थ्यांचा कलाविष्कार रंगला

लहान गटात शुभेच्छा कार्ड तर मोठ्या गटात पोस्टर स्पर्धा

प्रतिनिधी-शाहिद अहमद तुळवे, संगमेश्वर

कडवई येथील महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्समध्ये 14 सप्टेंबर 2025 रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या विशेष दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना लहान आणि मोठा अशा दोन गटात विभागण्यात आले होते.

लहान गटातील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी दिवसासाठी आकर्षक शुभेच्छा कार्डे तयार केली. विद्यार्थ्यांनी विविध रंगसंगती, चित्रकला आणि सुंदर संदेशांच्या माध्यमातून हिंदी भाषेबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त केला. दुसरीकडे, मोठ्या गटातील आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर चार्ट तयार केले. या पोस्टरमधून हिंदीचे राष्ट्रीय भाषा म्हणून असलेले महत्त्व, तिचे वैभव, प्रचार-प्रसार आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठीचे योगदान प्रभावीपणे साकारण्यात आले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींमध्ये सर्जनशीलता, देशभक्तीची भावना आणि भाषाप्रेम ठळकपणे जाणवले. परीक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि विजेत्यांचा गौरव प्रशस्तिपत्रक देऊन करण्यात आला. लहान गटात प्रथम क्रमांक कुमारी रानीया नझीर शेख हिने मिळवला. द्वितीय क्रमांक चा मान कुमारी शर्लीज शाहिद अहमद तुळवे हिने पटकवला, तर तृतीय क्रमांक कुमारी रिदा सम्रान हफसानी हिच्या नावे गेला. मोठ्या गटातील स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमार नूर आलम अन्सारी याने मिळवला. द्वितीय क्रमांकाचा मान कुमार आदिल शेख याला मिळाला, तर तृतीय क्रमांक कुमारी अरफा शेख हिने पटकावला.

या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हिंदी दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रचारासाठी योगदान देण्याचा प्रेरणादायी संदेश मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!