महाराष्ट्र

रियाज ठाकूर यांची ‘राष्ट्रीय लोक शिकायत एवं जांच आयोग NPGIC च्या जिल्हाध्यक्षपदी निवड

अभिनंदनाचा वर्षाव

​गुहागर:
रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते लोकांच्यासाठी अडी अडचणीत धावून जाणारे, प्रत्येक शासकीय कामात मदत करणारे, कुठल्याही रुग्णांसाठी हॉस्पिटल देण्यासाठी सहकार्य करणारे श्री. रियाज हुसैन ठाकूर यांची ‘नॅशनल पब्लिक ग्रीव्हन्स अँड इन्व्हेस्टिगेशन कमिशन नीती आयोग ‘ (NPGIC) या संस्थेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या दिल्ली येथील राष्ट्रीय सल्लागार मंडळाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही निवड केली आहे.
​NPGIC ही संस्था भारतीय ट्रस्ट कायदा, १८८२ अंतर्गत नोंदणीकृत असून ती मानवी हक्क, जन तक्रारी आणि सामाजिक प्रश्नांवर काम करते. रियाज ठाकूर यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवताना संस्थेने त्यांच्याकडून समाजातील गरजू घटकांना न्याय मिळवून देण्याची आणि घटनात्मक हक्कांप्रती जागरूकता निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
​या नियुक्तीबद्दल बोलताना रियाज ठाकूर म्हणाले की, “या पदाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी आणि त्यांना कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.” त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!