महाराष्ट्र
जि.प. व पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेर्डी येथे चिपळूण पोलिसांचा रूट मार्च
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली

चिपळूण:जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण पोलिसांचा आज बुधवार दिनांक 04/02/2026 रोजी बहादूरशेख नाका ते खेर्डी एमआयडीसी चिपळूण असा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रकाश बेले यांचे मार्गदर्शनाखाली रूट मार्च घेण्यात आला.
- सदर रूट मार्चकरिता उप विभागीय अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे व चिपळूण पोलिस ठाण्याचे 5 अधिकारी, 30 अंमलदार, RCP प्लाटूनचे 30 जवान व 56 होमगार्ड असे उपस्थित होते. तसेच रूट मार्च करीता 4 वाहनां चा वापर करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सतर्कता निर्माण झाली आहे.




