साताऱ्यात झळकली नॅशनल हायस्कूल व ज्यु. कॉलेज दापोलीच्या जरियान फारुक आराई ची ताकद
राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई

साताऱ्यात झळकली नॅशनल हायस्कूल व ज्यु. कॉलेज दापोलीच्या जरीयान फारूक अराईची ताकद
राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई
सातारा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन सातारा, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा २०२५–२६ मध्ये १७ वर्षाखालील वयोगटात नॅशनल ज्यु. कॉलेज दापोलीच्या जरीयान फारूक अराई याने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक (द्वितीय क्रमांक) पटकावला आहे.
८३ किलो वजनगटात खेळताना जरीयानने आपल्या ताकदीचा आणि सातत्यपूर्ण सरावाचा प्रभावी ठसा उमटवला. स्पर्धेदरम्यान त्याने
• स्क्वॉट : १२० किलो,
• बेंच प्रेस : ७५ किलो,
• डेडलिफ्ट : १६७.५ किलो
अशी दमदार उचल करत एकूण ३६२.५ किलो वजन यशस्वीरीत्या उचलले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे प्रेक्षकांसह पंचांनाही त्याच्या ताकदीची दखल घ्यावी लागली.
ही राज्यस्तरीय स्पर्धा छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे मोठ्या उत्साहात पार पडली. राज्यभरातून आलेल्या बलाढ्य खेळाडूंमध्ये झाऱ्यानने दाखवलेली जिद्द, आत्मविश्वास आणि तांत्रिक कौशल्य विशेष ठरले.
या यशामागे शिक्षक व प्रशिक्षक अशफाक मुस्तफा खान यांचे मार्गदर्शन, योग्य प्रशिक्षण, शिस्तबद्ध सराव आणि खेळाडूवरील विश्वास महत्त्वाचा ठरला. प्रशिक्षक अशफाक खान यांनी जरीयानच्या मेहनतीचे कौतुक करत “हे यश म्हणजे अजून मोठ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीची नांदी आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
जरीयान फारूक अराईच्या या घवघवीत यशामुळे कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, भविष्यात तो आणखी मोठी कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, स्कूल कमिटी चेअरमन जावेद मणियार, कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेमन, संस्थेचे सचिव इकबाल परकार, प्रशालेचे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांनी अभिनंदन व्यक्त केला.



