महाराष्ट्र

मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीचे वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

मुख्याध्यापक भाऊ लकेश्री यांनी मांडले शिवचरित्रावर प्रेरणादायी विचार

मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय व कै.सौ.कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मार्गताम्हाने येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन जडे सर यांनी केले. प्रशालेचे मुख्याध्यापक लकेश्री सर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली. विद्यार्थ्यांनी पिवळ्या रंगाच्या वेशभूषेत सहभाग घेत संपूर्ण परिसर शिवमय करून टाकला.
विद्यार्थी मनोगतात शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याबद्दल पोवाडा ११ वी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी कु. आयुष पेजले याने सादर केला आणि कु. अनिष्का, सोहम महाडिक यांनी आपले विचार अत्यंत आत्मविश्वासाने मांडले.सूर्यकांत जडये सर आणि प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री भाऊ लकेश्री सर यांनी शिवचरित्रावर प्रेरणादायी विचार व्यक्त करत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, शौर्य आणि प्रामाणिकपणाचा संदेश दिला. सौ श्रेया दळी मॅडम यांनी शिवरायांचे शिलेदार मावळे यांच्यावरती अतिशय मौलिक असे विचार मांडले व
कार्यक्रमाचे सुंदर नियोजन श्री. महेंद्र साळगावकर ,श्री.राकेश खांडेकर , सौ .मंजिरी दळवी , श्री.सुशीलकुमार कुंभार ,सौ.तन्वी भागवत यांनी केले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
अशा प्रकारे शिवजयंती उत्सवाने विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली आणि शिवचरित्रातून आदर्श जीवनमूल्यांचा संदेश दिला. 🚩या नंतर प्रशालेपासून मार्गताम्हाने परिसरात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत पदयात्रा काढली. व संपूर्ण परिसर शिवमय केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!