महाराष्ट्र
कुरवळ जावळी दत्तवाडी चे सुपुत्र मेजर रुपेश मनोहर जाधव यांची लेफ्टनंट कर्नल पदावर बढती
अभिनंदनाचा वर्षाव

खेड : तालुक्यातील कुरवळ जावळी (दत्तवाडी) या छोट्याशा गावातील सुपुत्र श्री.रुपेश मनोहर जाधव यांची भारतीय सैन्य दलातील ‘लेफ्टनंट कर्नल’ (Lt Col) या वरिष्ठ पदावर पदोन्नती झाली आहे.जोधपूर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात एक अत्यंत भावूक आणि अभिमानास्पद प्रसंग पाहायला मिळाला.
आई-वडिलांच्या हस्ते मानाचे पद
या पदोन्नती सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे रुपेश जाधव यांचे वडील निवृत्त हवालदार मनोहर चंद्रू जाधव आणि त्यांच्या मातोश्री सौ. मनीशा मनोहर जाधव स्वतः जोधपूर येथे उपस्थित होत्या.आपल्या मुलाच्या खांद्यावर “लेफ्टनंट कर्नल” पदाचे स्टार्स आपल्या हातांनी लावताना या माता-पित्याचा ऊर अभिमानाने भरून आला होता.एका निवृत्त सैनिकासाठी आपल्या मुलाला आपल्यापेक्षा वरच्या पदावर पाहण्यासारखा दुसरा मोठा आनंद नाही.अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




