चिपळूण अर्बन बँकेच्या नवीन इमारतीचे आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उदघाटन
पालकमंत्री उदय सामंत व खासदार नारायण राणे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
*चिपळूण अर्बन बँकेच्या नवीन इमारतीचे आज उदघाटन*
*गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भव्य वास्तुतून ग्राहकांना मिळणार सेवा*
*चिपळूण -विश्वास आणि आपुलकी जपणारी बँक म्हणून ओळख असलेल्या कोकणातील अग्रगण्य चिपळूण अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालय व मुख्य शाखेच्या नव्या अत्याधुनिक इमारतीचे उदघाटन आज गुरुवारी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दुपारी ३.३० वाजता उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे शुभ हस्ते होणार आहे.*
*चिपळूण अर्बन बँक ही गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांना विश्वासार्ह, सुरक्षित आणि दर्जेदार बँकिंग सेवा देत आहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन बँकेने नव्या इमारतीची उभारणी केली आहे. हे नवी वास्तू अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त जागा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून ग्राहकांना अधिक वेगवान, सोयीस्कर आणि दर्जेदार सेवा उपलब्ध होणार आहे.*
*या उद्घाटन सोहळ्याला खासदार नारायण राणे, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोपान शिंदे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, माजी नगराध्यक्ष सुचय रेडीज, कोअर कमिटी सदस्य उमेश काटकर यांच्यासह बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, उपाध्यक्ष धनंजय खातू, मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी, संचालिका राधिका पाथरे, निहार गुडेकर, निलेश भुरण, रहिमान दलवाई, प्रशांत शिरगावकर, समीर जानवळकर, गौरी रेळेकर, राजेश केळसकर, मिलिंद कापडी, रत्नदीप देवळेकर, समीर टाकळे, सुनील खेडेकर, संपदा रेडीज, दिलीप दळी, विवेक रेळेकर, दिनेश रेडीज, श्रीराम देवळेकर, सतीश खेडेकर, विराज दळी, मधुसूदन माने आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, सभासद, ग्राहक , हितचिंतक , व्यवसायिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.*
*हा कार्यक्रम चिपळूण शहरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. नवीन भव्य इमारतीमुळे बँकेतील सेवांना अधिक बळ मिळणार असून कोकणातील बँकिंग क्षेत्रात चिपळूण अर्बन बँकेची बँकिंग सेवा अधिक भक्कम होण्याची अपेक्षा केली जात आहे. बँकेच्या प्रगतीत ग्राहकांच्या अमुल्य सहकार्याचा व विश्वासाचा अमूल्य वाटा असल्याचे नमूद करत, या नवीन इमारतीद्वारे अधिक सक्षम व आधुनिक सेवा देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.*
*तरी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, उपाध्यक्ष धनंजय खातू व मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी यांनी केले आहे.*




