वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
पर्यवेक्षक विनोद पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन

मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय व कै.सौ. कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,मार्गताम्हाने येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पर्यवेक्षक श्री.विनोद पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका सौ.भारती येवले यांनी केले. ११ वी वाणिज्य या वर्गातील विद्यार्थिनी गौरी चव्हाण हिने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची माहिती सांगितली.११ वी कला या वर्गातील विद्यार्थिनी कु.वेदिका राऊत व कु.माधवी पटेल यांनी मराठी गौरव गीत सादर केले. आयुष पेजले या विद्यार्थ्याने ही जन्मभूमी ही कर्मभूमी हे गौरव गीत सादर केले.व कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेचे अप्रतिम सादरीकरण केले.ध्रुवी घाणेकर हिने मराठी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. इयत्ता अकरावी कॉमर्स विद्यार्थिनीनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या गीताचे समूह गायन केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी कुमारी रिद्धी पवार व शर्वरी लांजेकर यांनी काव्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी शुभ्रा चव्हाण यांनी केले व आभार कुमारी सिद्धी मोरे हिने मानले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक श्री.सूर्यकांत जडये,प्रा.सौ.वर्षा भोबस्कर,प्रा.सौ.तन्वी भागवत,सौ.स्नेहल पौनिकर, सौ.स्मिता मेस्त्री,सौ.मंजिरी दळवी,सौ.मुग्धा पवार,सौ. उज्वला काळे, प्रशालेतील विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. शुभ्रा चव्हाण या विद्यार्थिनीने केले व सिद्धी मोरे या विद्यार्थिनीने उपस्थितांचे आभार मानले.




