टच संस्थेमार्फत ‘विभा अरविंद ग्रंथालय’ व ‘आपलं चिपळूण’च्या सहयोगाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप

*टच संस्थेमार्फत, ‘विभा अरविंद ग्रंथालय’ व ‘आपलं चिपळूण’ च्या सहयोगाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम संपन्न*.
चिपळूण (प्रतिनिधी):
*विभा अरविंद ग्रंथालय* आणि *आपलं चिपळूण* या समाजाभिमुख संस्थांच्या सहयोगाने मुंबईस्थित *टच सामाजिक संस्था* यांच्या माध्यमातून सोमवार, दि. २२ जून रोजी चिपळूण तालुक्यातील मोरवणे पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १ व क्र. २ येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
*शिक्षण हेच सामर्थ्य”** ही संकल्पना ग्रामीण व दुर्गम भागात रुजविण्याच्या उद्देशाने ही संस्था सातत्याने कार्यरत असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून देण्याचे कार्य करत आहे.
या उपक्रमावेळी टच संस्थेच्या वतीने दर्शिनी देसाई आणि जया कांबळी उपस्थित होत्या. तसेच विभा अरविंद ग्रंथालय चे कार्यवाह श्री. विजय कदम,ग्रंथालयाचे कार्यकर्ते श्री सुमित सागवेकर, स्मिता मैदरकर मॅडम,श्री दत्त शिक्षण संस्थेचे चे अध्यक्ष श्री. तानाजीराव शिंदे, तसेच मोरवणे शाळा क्र. १ चे श्री. विजय शिंदे (अध्यक्ष, शिक्षण व्यवस्थापन समिती), मुख्याध्यापक श्री. मायाराम पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी श्री. शिवाजीराव शिंदे, माजी सैनिक श्री. रोहन शिंदे, केबल व्यावसायिक श्री. किरण शिंदे, पोलिस पाटील श्री. पूर्वा शिंदे, व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ. अस्मिता ढगळे, सौ. अवणी उंडरे, सौ. सुरेखा शिंदे, सौ. रिया शिंदे, सौ. समीक्षा ओंबळकर, श्री. प्रमोद शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. प्रकाश शिंदे, उपशिक्षिका सौ. विनया देवरूखकर आदि मान्यवर उपस्थित होते.
तसेच शाळा क्र. २ च्या मुख्याध्यापिका सौ. हेमलता गमरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संतोष जाधव, श्री. सुरेंद्र शिंदे (माजी सरपंच व शिक्षणतज्ज्ञ), श्रीमती शशिकला घायाळ (उपशिक्षिका) तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही संपूर्ण कार्यक्रमरचना सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी ठरली. या कार्यक्रमाकरिता विभा अरविंद ग्रंथालयाचे मुख्य मार्गदर्शक श्री प्रकाश काका देशपांडे आणि अध्यक्ष श्री बापूसाहेब काणे, तसेच आपलं चिपळूणचे कार्याध्यक्ष श्री संतोष देशमुख, सचिव श्री उदय ओतारी आणि आपलं चिपळूणचा समस्त संचालक वर्ग यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले होते




