असुर्डे खापरेवाडी ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भव्य प्रवेश : आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर ठाम विश्वास
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला धक्का

“लोकांच्या समस्या ऐकून घेणे ही सुरुवात असते, पण त्या सोडवणे हीच खरी नेतृत्वाची ओळख असते.”-आमदार शेखर निकम.
चिपळूण तालुक्यातील कोकरे जिल्हा परिषद गटातील असुर्डे खापरेवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चांगली चर्चा रंगली असून शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
यावेळी सोमा खापरे, काशिनाथ खापरे, संतोष खापरे, अजित खापरे, सुमित खापरे, राजेंद्र खापरे, प्रमोद खापरे, प्राजक्ता खापरे, अंकित खापरे, वंदना खापरे, शशिकांत खापरे, सुगंधा खापरे, योगेश खापरे, आरती खापरे, स्वाती खापरे, आयुष आग्रे, आर्यन खापरे, दिनेश खेराडे, सुजाता खेराडे, नरेंद्र खापरे, मानसी खापरे, राजेश आग्रे, कृष्णा आग्रे, अरुण आग्रे, अर्चना आग्रे, सायली आग्रे, मंगेश खापरे, गणपत खापरे, मिनाक्षी खापरे, अंजली खापरे, मारुती खापरे, प्रणय खापरे, बापूजी खापरे, प्रणय खापरे, सुजाता खापरे, महेंद्र खापरे, बापूजी खापरे, सुस्मिता खापरे, पांडूरंग खापरे, प्रतिभा खापरे, महेश खापरे, शांताराम शिगवण, विशाल शिगवण, दत्ताराम खापरे, कृष्णा खापरे, सुरज खापरे, सावी खापरे, रेश्मा खापरे, शर्मिला भुवड, धोंडू भुवड, संदेश खापरे, पारस खापरे, गणेश खापरे, सृष्टी खापरे, नारायण खापरे, ओम खापरे, सार्थक खापरे, निखील खापरे, ओम भुवड यांनी उत्स्फूर्तपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आमदार शेखर निकम यांनी सर्व नवप्रवेशितांचे संपर्क कार्यालयात मनापासून स्वागत करत त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला. ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी व विकासात्मक कामांना गती देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच याचा पक्ष वाढीसाठी व पक्ष संघटना वाढीसाठी नक्कीच फायदा होईल असे नमूद केले.
ननिर्वाचित सावर्डे जि. प. गट सदस्या पुजा निकम यांनीही असुर्डे खापरेवाडी प्रवेशकर्ते ग्रामस्थांचे पक्षात स्वागत केले व त्यांना पक्ष वाढविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवनिर्वाचित कोकरे जि.प. गट सदस्य संजय कदम यांनीही असुर्डे खापरेवाडी ग्रामस्थांचे पक्षात स्वागत केले व आपण पक्ष वाढीसाठी एकत्र काम करत राहू तसेच भविष्यात ग्रामस्थांच्या विकासात्मक कामांबाबत ठामपणे पाठीशी उभा राहण्याचा शब्द त्यांनी दिला.
कार्यक्रमास नवनिर्वाचित सावर्डे जि.प. सदस्या पुजा निकम, कोकरे जि.प. गट सदस्य संजय कदम, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष दत्ताराम गुजर, आरडीसीसी संचालक राजेंद्र सुर्वे, सरपंच पंकज साळवी, सुधीर राजेशिर्के, निलेश खापरे यांच्यासह कोकरे जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा प्रवेश केवळ राजकीय बदल नसून विकासाच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.




