जलसंपदा विभाग,अर्थ फाउंडेशन व पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल चिपळूण चे सुयश
सफुरा खतीब मोठ्या गटात द्वितीय तर अब्दल्लाह तांबे लहान गटात द्वितीय

चिपळूण – जलसंपदा विभाग रत्नागिरी, अर्थ फाउंडेशन चिपळूण व चिपळूण पंचायत समिती (शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने जल सप्ताह व जल दिनानिमित्त ‘पाणी’ या विषयावर रंगभरण, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा नुकत्याच रामतीर्थ तलाव चिपळूण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडल्या. यापैकी वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल चिपळूण ने शानदार यश संपादन केले. इयत्ता ८ वी ची विद्यार्थिनी सफुरा इम्रान खतीब हिने मोठ्या गटात द्वितीय क्रमांक तर इयत्ता ६ वी चा विद्यार्थी अब्दल्लाह रिजवान तांबे यांने लहान गटात द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस प्रदान करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, पंचायत समिती उपसभापती संदेश आयरे, उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या यशाबद्दल त्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे चिपळूण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक- शिक्षकेतरवृंदाने अभिनंदन केले.




