अपरांत हॉस्पिटल येथे स्त्री रोग व प्रसुती तज्ञ डॉ. पूजा भुरण यांची सेवा १० एप्रिल पासून सुरू होणार
स्त्रियांचे सर्व प्रकारचे रोग निवारण होणार

*अपरांत हॉस्पिटल येथे स्त्री रोग व प्रसूती तज्ञ डॉ.पूजा भुरण यांची सेवा दिनांक 10 एप्रिल पासून उपलब्ध होणार.*
अपरांत हॉस्पिटल येथे सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. पूजा भुरण यांची तज्ञ सेवा स्त्री रुग्णांसाठी अहर्निश उपलब्ध होणार आहे . गर्भधारणा आणि प्रसूती सेवा अंतर्गत सामान्य प्रसूती, सी-सेक्शन, उच्च-जोखीम गर्भधारणा (High-risk pregnancy) यांचे व्यवस्थापन,
स्त्री आजारांचे निदान व उपचार, मासिक पाळीच्या समस्या, PCOD/PCOS, फायब्रॉइड्स, एंडोमेट्रियोसिस, इन्फर्टिलिटी (वंधत्व) उपचार,
कुटुंब नियोजन पद्धती, या स्त्रीविकार व प्रसूती शास्त्रातील विविध विषयांमध्ये डॉ.पूजा भुरण यांचा विशेष अनुभव, अभ्यास व कौशल्य आहे.
स्त्री आरोग्य जागरूकतेसाठी गर्भाशयाचा कर्करोग स्क्रीनिंग, ब्रेस्ट हेल्थ स्क्रिनिंग, मेनोपॉज संबंधित समस्याविषयक समुपदेशन अशी विविध अभियाने हाती घ्यावीत असा त्यांचा मानस आहे.
त्यांचा दृष्टिकोन महिलांच्या भावना समजून घेणारा आणि काळजीपूर्वक हाताळणी करणारा असून,प्रत्येक स्त्री रुग्णाला वैयक्तिक रित्या लक्ष देऊन,त्यांच्या भीती, शंका आणि अपेक्षा लक्षात घेऊन अचूक उपचार व मार्गदर्शन मिळणार आहे. यानिमित्ताने गर्भवती मातांना सुरक्षित आणि आश्वासक रुग्णसेवा उपलब्ध झाली आहे.
अपरांत हॉस्पिटलचा प्रसूती विभाग, सोनोग्राफी, जोखमीच्या रुग्णांना अतिदक्षता विभाग, उच्च दर्जाचे शस्त्रक्रियागृह, 24 तास रेडिओलॉजिस्ट व पॅथॉलॉजी विभाग, गरोदर स्त्रियांसाठी व्यायाम आणि फिजिओथेरपी व डाएट विषयक तज्ञ सल्ला यासारख्या सुसज्ज व अद्ययावत सुविधांनी युक्त असून समस्त स्त्री रुग्णांना या विभागाद्वारे परिपूर्ण सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
अपरांत हॉस्पिटलच्या बाह्य रुग्ण विभागामध्ये गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. पूजा भुरण या सकाळी १० ते दुपारी २ व संध्याकाळी ५ ते ७ या कालावधीत रुग्ण तपासणी करिता उपलब्ध असतील.
आपत्कालीन सेवेसाठी त्या २४*७ उपलब्ध असतील.
स्त्री रुग्णांनी
७९९८८९८९८९ ७९९८७३७३७३
या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन
अपरांत व्यवस्थापनातर्फे करण्यात येत आहे.





