महिला दिनानिमित्त तहसीलदार अमृता साबळे यांचा सन्मान
लोक निर्माण प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात गौरव

*महिला दिनानिमित्त तहसीलदार अमृता साबळे यांचा सन्मान*
*संगमेश्वर/ सत्यवान विचारे*
१ मे कामगार दिन व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत लोकनिर्माण वृत्तपत्राच्या वतीने संगमेश्वरच्या तहसीलदार श्रीम. अमृता साबळे यांचा कार्यक्षम अधिकारी म्हणून सन्मान करण्यात आला.
त्यानंतर लोकनिर्माण वृत्तपत्राच्या विशेष अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. व्यासपीठावर लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक तथा लोकनिर्माण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाळकृष्ण कासार, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. दादा अनेराव, तहसीलदार अमृता साबळे, देवरुखच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, सहाय्यक गटविकास अधिकारी विनोद शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या वतीने चार कार्यक्षम अधिकारी, तीन गुणवंत कामगारांना तर तीन महिलांना हिरकणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिला सक्षमीकरण, प्रशासनातील कार्यक्षमता आणि कामगारांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
हा सन्मान सोहळा लोकमान्य वाचनालय देवरुख येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यकर्माचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी केले.