महाराष्ट्र

पैगंबर वासी मुनीर सर यांच्या स्मरणार्थ आज पुण्यात “मुनीर सर मेमोरियल प्रोग्राम” चे आयोजन

सर्व क्षेत्रातील मान्यवर व राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभणार

(जमालुद्दीन बंदरकर)
चिपळूण – कुलसम मुनीर फाउंडेशनच्या वतीने शासकीय उर्दू अध्यापक विद्यालय पुणे ( गोव्हरमेंट डी.एड कॉलेज, पुणे)चे माजी प्राचार्य पैगंबरवासी शेख मुनीर सर यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ “मुनीर सर मेमोरियल प्रोग्राम”चे आयोजन आज रविवारी आज़म कॅम्पस पुणे असेंबली हॉल येथे करण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे, शिस्तप्रिय, दूरदर्शी शिक्षक म्हणून ख्याती असलेले व आपल्या विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असलेल्या मुनीर सरांना आदरांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पैगंबर वासी मुनीर सर यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षण, संस्कार, शिस्त, न्याय, राष्ट्रनिर्मिती या मूल्यांचा प्रसार करत आपल्या अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ असून मुनीर सरांनी दिलेल्या शिकवणीचा अवलंब करीत आपले नावलौकिक करण्यास यशस्वी झाले आहेत.
पैगंबर वासी मुनीर सर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व त्यांचा गौरव करण्यासाठी सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, शिक्षण प्रेमी, व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत.
आज सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व कार्यक्रम यशस्वी करावे असे आवाहन कुलसुम मुनीर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!