महाराष्ट्र

नेरुळ मध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

नेरूळमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा.

दिनांक ५ जून २०२६ रोजी सकाळी ९.००वाजता. सरदार वल्लभभाई पटेल उद्यान, सेक्टर ९, नेरूळ, नवी मुंबई येथे जागतिक पर्यावरण दिन . ज्येष्ठ नागरिक संघ, नेरूळ, अखिल भारतीय वरिष्ठ महासंघ तसेच महाराष्ट्र वरिष्ठ नागरिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा झाला.

प्रमुख पाहुणे नगरसेविका सौ .मीरा पाटील , ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. दि.ना. चापके आणि जेष्ठ नागरिक सभासदांच्या हस्ते अनेक पर्यावरण पूरक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

नेरूळ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. विकास साठे तसेच माजी अध्यक्ष श्री .अरविंद वाळवेकर, सचिव श्री .अजय माढेकर, कोषाध्यक्ष श्री. दीपक दिघे,डॉ. डफळ , डॉ.जे. अंकुशराव व बहुसंख्येने ज्येष्ठ नागरिक सभासद उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या भाषणात पृथ्वीचे वाढत चाललेले तपमान आणि लहरी निसर्ग याच्यावर चिंता व्यक्त केली आणि वृक्षारोपणासह संवर्धनाची गरज अधोरेखित केली.

नवी मुंबईत आणि तसेच सर्वत्र डेव्हलपमेंट , रि -डेव्हलपमेंट, रस्त्यांची कामे यामध्ये लहान-मोठ्या झाडांची खूप मोठी हानी झाली आणि होत आहे. याबाबतीत अनेकांनी खंत व्यक्त केले.

कार्यक्रमाप्रसंगी झाडे लावा आणि झाडे जगवा असा नारा देत संदेश दिला.

अत्यंत उत्साहाच्या वातावरणात 5 जून जागतिक पर्यावरण दिन ज्येष्ठ नागरिकांनी झाडे लावून साजरा केला.

भालचंद्र माने.प्रसिद्ध प्रमुख ,ज्येष्ठ नागरिक संघ ,नेरूळ, नवी मुंबई.

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!