महाराष्ट्र
लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या ‘सिंदूर’ दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाकडून पुरस्कार
अभिनंदनाचा वर्षाव
लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या ‘सिंदूर’ या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी वर्ष आणि पत्रकार दिनानिमित्त बी आर दंडवते सभागृह, महाराष्ट्र हायस्कूल शेजारी ना.म.जोशी मार्ग, करी रोड , पश्चिम मुंबई येथील सभागृहात मान्यवरांच्या हस्ते मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी मुंबईचे माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे, ज्येष्ठ संपादक सुकृत खांडेकर, सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्त्या व कवयित्री जयश्री संगीतराव, संघाचे प्रमुख कार्यवाहक अशोक भोसले आणि संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर यांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी २५ पत्रकारांनी पाच दिवाळी अंकासाठी संपादकांना शाल,सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
- बाळकृष्ण कासार हे गेली ह चाळीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून लोक निर्माण मराठी वृत्तपत्र, लोक निर्माण प्रिंट इन डिजिटल मीडिया व लोक निर्माण न्यूज चॅनलचे संपादक असून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असून दिवाळी अंकाला दोन राज्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कोविड १९ या दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय मराठी अंक या संघटने कडून उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.




