महाराष्ट्र

रियाज चौगुले ठरला ‘रत्नागिरी श्री’ चा मानकरी

अभिनंदनाचा वर्षाव

*रियाज चौघुले ठरला “रत्नागिरी श्री” चा मानकरी…*
खेड: पंधरागाव विभागातील वावे गावचा सुपुत्र बॉडी बिल्डर रियाज चौगुले याने शरीर सौष्ठव निवड चाचणी स्पर्धेत आपल्या पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव स्पर्धेतील मानाचा “रत्नागिरी श्री” हा गोल्ड मेडल पटकाविला आहे. त्यामुळे त्याला आता राज्यस्तरावर आपला खेळ दाखविण्याची संधी उपलब्ध झाली आहे..
आदर्श क्रिडा व सामाजिक प्रभोधिनी च्या माध्यमातून व रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने या स्पर्धा कावीळतली चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच, राष्ट्रीय प्रशिक्षक तसेच अंतराष्ट्रीय प्रशिक्षक देखील उपस्थित होते.या स्पर्धे मध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विविध गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये रियाज ने “रत्नागिरी श्री” हा मानाचा गोल्ड मेडल पटकाविण्यात यश मिळविले आहे..
रियाजने आपला हा विजय नुकत्याच निधन झालेल्या आपल्या वडिलांना समर्पित केला आहे. आपल्या या यशामध्ये आई- वडील, कुटुंबिय व आंतरराष्ट्रीय कोच नंदू शिदे सर यांचा मोळाचा वाटा असल्याचे त्याने म्हटले आहे
रियाज चौघुले हा पत्रकार इकबाल चौघुले यांचा पुतण्या असून “रत्नागिरी श्री” हा शरीर सौष्ठव स्पर्धेतील मानाचा गोल्ड मेडल त्याने पटकाविल्याबद्दल त्याच्या वर विविध स्तरातू अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!