महाराष्ट्र

श्री ग्राम देवी सुखाई देवी यात्रोत्सव निमित्त भव्य कबड्डी स्पर्धा व नमन कार्यक्रम

१५ मार्च ते १७ मार्च कबड्डी स्पर्धा

*श्री ग्रामदेवी सुखाई देवी यात्रोत्सव निमित्त भव्य कबड्डी स्पर्धा व नमन कार्यक्रम*
*चिपळूण :* श्री ग्रामदेवी सुखाई देवी यात्रोत्सवानिमित्त श्री सुखाई देवी क्रीडा मंडळ व ग्रामस्थ खेर्डी यांच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धा दिनांक *१५ मार्च २०२६ ते १७ मार्च २०२६* दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
तरी गावातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यावा व खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, ही नम्र विनंती.
तसेच दिनांक १७ मार्च २०२६ रोजी रात्री १० वाजता श्रीराम नाट्य नमन मंडळ कामथे यांचा
“तळपता सूर्य साक्षीला अर्थात चाहूल लागली वाघदरीच्या जखमी वाघाला” हा पारंपरिक नमन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन
श्री सुखाई देवी क्रीडा मंडळ व ग्रामस्थ खेर्डी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!