महाराष्ट्र
मिलिंद हायस्कूल मोतीबाई कनिष्ठ महाविद्यालय रामपूरच्या प्राचार्या आशा नलावडे सेवानिवृत्त
रामपूर एज्युकेशन सोसायटीच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान

- *🟣 मिलिंद हायस्कूल मोतीबाई कनिष्ठ महाविद्यालय रामपूरच्या प्राचार्य आशा उत्तम नलावडे सेवानिवृत्त*
*🔸रामपूर एज्युकेशन सोसायटी मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार सोहळा*
*रामपूर :* मिलिंद हायस्कूल मोतीबाई एम. ठाकरसी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य आशा उत्तम नलावडे मॅडम नियत वयोमानामुळे तीस वर्षाची प्रदीर्घ सेवा करून २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या निरोप समारंभ व सत्कार सोहळा रामपूर एज्युकेशन सोसायटी मिलिंद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय माजी मुख्याध्यापक कोसंबी, शिरवली, कात्रोळी, भोम, पोफळी, चिपळूण हायस्कूलचे शिक्षक, आप्तेष्ट यांच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुंबईचे प्रसिद्ध कामगार नेते चेअरमन शंकरराव साळवी होते. यांच्या अध्यक्षतेखाली दिपप्रज्वलन शंकरराव साळवी, सेक्रेटरी सदाभाई चव्हाण, माजी मुख्याध्यापक अनिलकुमार जोशी, माजी मुख्याध्यापक विनायक तांबे, मुख्याध्यापक प्रभुणे सर यांनी केले. सरस्वतीच्या प्रतिमेस कोषाध्यक्ष रमेशराव चव्हाण यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. मुंबई केदारनाथ सेवा मंडळ अध्यक्ष पांडुरंग चव्हाण यांनी श्रीफळ वाढविले. बारावीच्या मुलींनी ईशस्तवन, स्वागतगीत सादर केले. सर्वांचे स्वागत व प्रस्ताविक नवनियुक्त मुख्याध्यापक सुभाष वीरकर सर यांनी केले. सौ. आशा नलावडे व त्यांचे पती उत्तम नलावडे यांचे रामपूर एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, संचालक, माजी मुख्याध्यापक यांच्या शाल, श्रीफळ, पुष्प देऊन सत्कार केला. आशा नलावडे मॅडम ज्युनियर कॉलेजमध्ये १९९७ साली तासिका तत्वावर हिंदी विषय प्रमुख म्हणून काम केले. नंतर पार्ट टाइम, पूर्ण वेळ प्राध्यापिका म्हणून कै. रामनाथ मोते सर आमदार यांच्यामुळे त्यांना संचालकांकडून संच मान्यता मिळाली. संघर्षातून यशाकडे त्यांची वाटचाल प्रशंसनीय आहे. २०२३ पासून २८ फेब्रु. २०२६ पर्यंत प्राचार्य म्हणून काम केले. इतिहास व हिंदी विषयाचे निकाल, १२ वीचे १०० टक्के निकाल तीस वर्षे लागले.
त्यांचा रामपूर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने चेअरमन शंकरराव साळवी, सेक्रेटरी सदाभाई चव्हाण, सहसेक्रेटरी सुरेशशेठ साळवी, कोषाध्यक्ष रमेशराव चव्हाण, डॉ. राजेंद्र चव्हाण, पांडुरंग चव्हाण, वीरधवल मोरे, अशोक चव्हाण डॉ. मनोज रावराणे यांच्या हस्ते साडी, सन्मानपत्र, अन्य भेट वस्तू देऊन गौरव केला. मिलिंद हायस्कूल, मोतीबाई एम. ठाकरसी कनिष्ठ महाविद्यालय सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माझी मुख्याध्यापक अनिलकुमार जोशी, तांबे सर, प्रभूणे सर, भोम, कात्रोळी, शिरवली, कोसंबी, पोफळी, चिपळूण शिक्षक, मुख्याध्यापक, नलावडे मॅडम यांचे आप्तेष्ट यांनी शाल, श्रीफळ, साडी भेटवस्तू देऊन नलावडे मॅडम यांचा भावपूर्ण सत्कार केला.
सौ.नलावडे मॅडम यांच्या कार्यशैलीवर नवीन मुख्याध्यापक वीरकर सर, माजी मुख्याध्यापक तांबे सर, अनिलकुमार जोशी सर, प्रभुणे सर, डॉ. मनोज रावराणे, कामगार नेते सेक्रेटरी सदाभाई चव्हाण, चेअरमन शंकरराव साळवी, शिरवली हायस्कूलचे मुख्याध्यापक कोकाटे सर यांनी मनोगते व्यक्त केली.
आशा उत्तम नलावडे यांनी रामपूर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकारी, संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्तम सहकार्यामुळे काम करता आले, त्यांनी सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महेश फावरे सर यांनी सूत्रसंचालन, समारोप केला.




