महाराष्ट्र

खेड चे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्यातर्फे आज इफ्तार पार्टी

सर्व मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन

खेड -माजी नगराध्यक्ष एडवोकेट श्री वैभवजी खेडेकर मित्र परिवार तर्फे रमजान सणा निमित्त आज शनिवार दि. १४ मार्च – २०२६ रोजी साय. ६.००वा. हॉटेल चंदी हवेली भरणे नाका मुस्लिम बांधवांकरिता’ इफ्तार पार्टी , चे आयोजन करण्यात आले आहे.
रमजानच्या पवित्र सणामुळे सध्या मुस्लिम बांधवांचे सर्वत्र उपवास सुरू आहेत. संपूर्ण समाजात आंनदाचे व उत्साहाचे वातावरण सुरू आहे.’त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची सामाजिक बांधिलकी जपण्या करिता.सालाबादप्रमाणे यावर्षी देखील वैभवजी खेडेकर मित्रपरिवार यांच्यातर्फे ‘ईफ्तार पार्टी’ चे आयोजन केले आहे.
आजपर्यंत खेड मध्ये सर्व धर्मियांच्या सणांमध्ये वैभवजी खेडेकर अग्रक्रमाने सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपत सर्व सणाचा, व नागरिकांचा उत्साह द्विगुणित करीत आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या ‘ईफ्तार पार्टी’चे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व मुस्लिम बांधवांनी या ‘ईफ्तार पार्टी’ मध्ये बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अँड. वैभव खेडेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!