महाराष्ट्र
श्री ग्राम देवी सुखाई देवस्थान खेर्डीच्या वतीने ग्रामदेवतेची पालखी अत्याधुनिक पद्धतीने सज्ज
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी कोकणातील एकमेव पालखी

*श्री ग्रामदेवी सुखाई देवस्थान खेर्डी चिपळूण* यांच्या वतीने यावर्षी ग्रामदेवतेची पालखी अत्याधुनिक पद्धतीने सज्ज करण्यात आली आहे.
गावातील वाडी–वस्तवर फिरणारी ग्रामदेवतेची पालखी आता हायटेक स्वरूपात तयार करण्यात आली असून त्यामध्ये *वाय-फाय सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, इन्व्हर्टर* व्यवस्था तसेच गावातील कोणत्या लोकेशनवर पालखी आहे याची माहिती थेट अध्यक्षांच्या मोबाईलवर मिळावी यासाठी *लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग* प्रणाली बसविण्यात आली आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशी पालखी कोकणातील एकमेव असल्याचा मान यावर्षी खेर्डी ग्रामदेवता सुखाई देवी यांच्या पालखीला मिळाला आहे…
या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे संपूर्ण गावामध्ये आनंद अभिमान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे…




