स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी संघटनेकडून नूतन सभापतींचा सत्कार
सभापती सूर्यकांत खेतले व उपसभापती संदेश आयरे सन्मानित

*चिपळूण :* तालुका स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी संघटनेच्या वतीने चिपळूण पंचायत समितीचे नूतन सभापती सूर्यकांतजी खेतले व उपसभापती संदेशजी आयरे यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. अनेक वर्षानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये पदाधिकारी कार्यरत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची व कर्मचाऱ्यांच्या कामांना गती प्राप्त होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित असलेले नवनिर्वाचित सदस्य शरद शिगवण, शौकत माखजनकर, सुभाष जाधव, गौरव पाटेकर, विनोद झगडे यांचेही अभिनंदन करण्यात आले. या सदिच्छा समारंभासाठी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस प्रदीप पवार, चिपळूण तालुका अध्यक्ष प्रकाश शिंदे, सरचिटणीस चंद्रकांत जंगम, जिल्हा पदाधिकारी जगदीश कांबळे, संघटनेच्या पदाधिकारी व चिपळूण नगर परिषदेच्या नगरसेविका नसरीन खडस, माजी शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण पवार, प्रशांत सुर्वे, रमेश राजेशिर्के, माजी केंद्रीय प्रमुख शैलजा आखाडे, संताजी शिंदे, रामभाऊ लांडे, मधुकर मोहिते तसेच रमेश तांबीटकर, रामकृष्ण कदम, प्रदीप शांताराम पवार, शशिकांत बांद्रे इत्यादी संघटना पदाधिकारी उपस्थित होते.




