महाराष्ट्र

पवन तलाव मैदानाच्या विकासासाठी रुपये एक कोटी १४ लाख मंजूर

आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश

*चिपळूण :* चिपळूण शहरातील क्रीडाप्रेमी युवकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत पवन तलाव येथील खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी रु. १ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

या निधीतून गेली अनेक वर्ष पडून असलेल्या इमारतीचे होणार सुशोभीकरण मैदानाचा सर्वांगीण विकास करताना कॉमेन्ट्री बॉक्स तसेच इनडोअर स्टेडियमचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे चिपळूणमधील क्रीडापटूंना सराव आणि स्पर्धांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार असून स्थानिक क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळणार आहे. आमदार शेखर निकम यांच्या या प्रयत्नांमुळे चिपळूणच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि दिशा मिळणार असल्याची भावना क्रीडाप्रेमी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!