चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा-माजी सभापती शौकत भाई मुकादम
मुंबई गोवा हायवे कडे लक्ष देण्याची मुकादम यांची मागणी
*चिपळूण :* गेली १७ वर्ष मुंबई गोवा हायवे चे काम सुरू आहे. कामाच्या विलंबामुळे अनेक अपघात झाले, अनेक लोकांना जीव गमवावे लागले हे दुर्दैवी आहे. मुंबई गोवा हावेच्या रस्त्याला एवढी वळणे ठेवण्यात आले आहेत, तेवढी वळणे महाराष्ट्रात कोणत्याही हायवेला नाही. अनेक ठेकेदार बदलले गेले, परंतु काम काही केल्यास पूर्ण होईना, हे आमचे दुर्दैव समजायचे का.?
हायवेचे संबंधित अधिकारी मंत्री महोदयांना काम पूर्ण करण्याच्या तारखेवर तारखा देत आहेत, म्हणजेच संबंधित अधिकारी मंत्री महोदयांना चुकीची व खोटी माहिती देतात. त्या अनुषंगाने मंत्री महोदय काम पूर्ण होण्याच्या तारखा जाहीर करतात, त्या कालावधीमध्ये काम पूर्ण होत नाही यामुळे मंत्री महोदय यांची बदनामी होत आहे याला जबाबदार कोण?..
असा प्रश्न पंचायत समितीचे माजी सभापती मुकादम यांनी उपस्थित केला आहे व तसे निवेदन केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब यांनी पाठविले आहे.
मुंबई गोवा हायवे मार्गावर कळंबस्ते बौद्धवाडी देखील येथील रेल्वे क्रॉसिंग वर अजून देखील हायवेच्या पुलाचे काम सुरू करण्यात आलेले नाही, मग बाकीकडे चार पदरी आणि या ठिकाणी एक पदरी यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होणार आहे. तसेच पावसाला जवळ आलेला आहे. कोकण हा डोंगरी भाग आहे,यामुळे डोंगरातील पावसाळी पाणी रस्त्यावर येते. हायवेचा रस्ता खाली व गटारे उंच वाढण्यात आल्यामुळे काही ठिकाणी पाणी रस्त्यावर साठून राहते.यावरही अद्याप उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत,त्यामुळे दुर्दैवाने अजूनही अपघात होत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ठेकेदार कंपनीवर वचक नसल्यामुळे वरील सर्व प्रकार घडत आहेत. शासन परिपत्रक क्रमांक. संकीर्ण _२०१७/प्र. क्र.९/रस्ता बांधकाम नियोजन क्र.३ या कायद्यानुसार केंद्रीय मंत्री श्री.नितीनजी गडकरी साहेब यांनी संबंधितावर कार्यवाही करावी, म्हणजे काम जलद गतीने होईल,अशी मागणी देखील श्री.मुकादम यांनी केली आहे.



