महाराष्ट्र
खेर्डीतील कबड्डी स्पर्धेला शेवटच्या दिवशी भारतीय संघाचे खेळाडू विजय घाडीगावकर भेट देणार
सर्व क्रीडा रसिकांनी खेळाचा मनमुराद आनंद घेण्याचे केले आवाहन

*खेर्डीतील कबड्डी स्पर्धेला अंतीम दिवशी भारतीय संघाचे खेळाडु विजय घाडीगावकर देणार भेट*
दिशा फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी,खेर्डी आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा ही खेर्डीतील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व श्री.अनिल शेठ दाभोळकर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि.30 मार्च 2026 ते बुधवार दि.1 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेली असुन या स्पर्धेचे उदघाटन चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा.श्री.शेखरजी निकम सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या भव्य दिव्य स्पर्धेच्या अंतीम दिवशी भारतीय कबड्डी संघाचे खेळाडु,बालेवाडी व मणिपूर या दोन ठिकाणी आयोजित आशिया कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले, आंतरजिल्हा कबड्डी स्पर्धेत मुंबई संघाचे कर्णधार म्हणून सलग 5 वर्ष प्रतिनिधित्व तसेच आंतरराज्य कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे सलग 3 वर्ष प्रतिनिधित्व केलेले एअर इंडियाचे नामवंत खेळाडु श्री.विजयजी घाडीगावकर यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभणार आहे.या तालुकास्तरीय स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील 16 संघानी सहभाग घेतला असुन ह्या स्पर्धेत प्रो कबड्डी स्टार खेळाडु अजिंक्य पवार याच्यासह अनेक नामवंत खेळाडु त्यांच्या स्थानिक संघातून खेळताना दिसत आहेत तरी सदर स्पर्धा पाहण्यासाठी खेर्डीतील तसेच चिपळूण तालुक्यातील सर्व कबड्डी रसिकांनी उपस्थित राहुन खेळाचा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन दिशा फाऊंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस,खेर्डी च्या वतीने करण्यात येत आहे.




