
चिपळूण : कोकण मर्कंटाईल को. ऑप. बँकेचे सुपरवायझर बन शिरळ मोहल्याचे सुपुत्र रफिक कमालुद्दीन नाईक हे आपल्या 34 वर्षाच्या बँकेतील सेवेनंतर मंगळवार दि. 31 मार्च रोजी कोकण मर्कंटाईल बँकेच्या चिपळूण शाखेतून सेवा निवृत्त होत आहेत.
कोकण मर्कंटाईल को. ऑप. बँक लि.चे मुख्य कार्यालय माझगाव – मुंबई येथे आहे. बँकेच्या रत्नागिरी शाखेत 2 फेब्रुवारी 1992 मध्ये रफिक नाईक क्लार्क म्हणून रुजू झाले. आपला खेळकर स्वभाव, कामाबद्दल असलेली लगन व ग्राहकांबरोबर सौजण्याची वागणूक, तत्पर सेवा या गुणामुळेच ते अल्पावधित सर्वपरिचित झाले. बँकेत येणाऱ्या ग्राहकांना ते तत्पर सेवा देऊ लागल्याने त्यांच्यावर विश्वास वाढला. एक गुणी व सेवाभावी कर्मचारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली. बँकेचे संचालक, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्यांच्या कामाचे कौतुक होते. प्रथम रत्नागिरी शाखेत पाच वर्षे व नंतर तीन महिने, कोल्हापूर शाखेत 11 महिने, खेड शाखेत 23 महिने त्यांनी सेवा बजावली. याशिवाय उर्वरित सर्व कामकाज त्यांनी चिपळूण शाखेत केले आहे. चांगल्या कामाबद्दल 2019 मध्ये बँकेने त्यांना अप्रेशिएशन अवार्ड देऊन तत्कालीन चेअरमन नजीब मुल्ला यांच्या हस्ते गौरविले आहे.
बँकेतील नोकरी सांभाळतानाच आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने त्यांनी सामाजिक कार्यातही भाग घेतला. लोकांना शक्य तेवढी मदत करून दिनदुबल्यांची सेवा करण्यात त्यांनी धन्यता मानली. त्यांचे काम पाहून
जमातुल मुस्लिम बन मोहल्लाने त्यांना सेक्रेटरी केले. आपल्या चांगल्या कामाच्या जीवावर गेली वीस वर्ष रफिक सेक्रेटरी आहेत. बन मोहल्ला अध्यक्ष दिलावर काद्री यांची त्यांना समर्थ साथ लाभल्याने गावात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत.
रफिक नाईक उद्या मंगळवारी सेवानिवृत्त होणार असल्याने बँकेतर्फे आज सोमवारी त्यांना सहकाऱ्यातर्फे निरोप दिला जणार आहे. त्यांचा सत्कार, सन्मान करण्यात येणार असून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येणार आहेत.जमातुल मुस्लीम
बन मोहल्ला ग्रामस्थांतर्फे अध्यक्ष, माजी तंटामुक्त अध्यक्ष व माजी सरपंच दिलावर काद्री, उपाध्यक्ष
मैनुद्दीन काद्री, अहमद सय्यद, इम्रान गोठे, हुसैन काद्री, यासिन काद्री,फैसल चिवेलकर, अकील पिंपळकर, शम्स गोठे, शफूर गोठे, इसाक काद्री,
नासिर काद्री, रहीम नाईक,नवेद काद्री, इरफान गोठे,
आसिफ चिवेलकर, दानिश काद्री, जुबेर गोठे, मजीद चिवेलकर, अशपाक काद्री, जाफर गोठे, अमीन मुकरी, फैय्याज शिरळकर, सरपंच शशिकांत राऊत, जबीर सुर्वे, सत्तार वांगडे, नाझिम दलवाई, मुराद कडवेकर, अजीम मदरे वशिरळ बन मोहल्ला ग्रामस्थानी रफिक नाईक यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.





