महाराष्ट्र
लोक निर्माण वृत्तपत्रातर्फे देवरुखात होणार कामगार दिन व महिला दिन साजरा
विविध पुरस्कारांनी महिला आणि कामगारांचा होणार सन्मान

*संगमेश्वर प्रतिनिधी*
- लोक निर्माण वृत्तपत्र आणि लोक निर्माण प्रतिष्ठान च्या माध्यमातून दरवर्षी महिला आणि कामगार दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी शुक्रवार दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता देवरुख येथील सद्गुरु लोकमान्य वाचनालय सभागृह, मातृमंदीर समोर देवरुख येथे महिला आणि कामगार दिनाच्या विशेष अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार असून या दिवशी कर्तृत्ववान महिलांना हिरकणी सन्मान, विशेष प्रशासकीय अधिकारी, निवृत्त गुणवंत कामगार आणि अधिकारी यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तरी या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे सहसंपादक युयुत्सु आर्ते यांनी आवाहन केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖



