
चिपळूण – वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने उभारलेल्या ‘ विभा अरविंद ग्रंथालय’ चे उद्घाटन आज रविवार दिनांक २४ मे २०२६ भाऊजी सायंकाळी ५.०० होणार असून हा कार्यक्रम चिपळूण शहरात खेंड येथील स्प्रिंग क्लिनिकच्या तळमजल्यावर ,जेड गार्डन, स्वर विहार, गणपती मंदिर शेजारी पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृशिभूषण तानाजीराव भूषविणार असून चिपळूण चे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे. कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून चिपळूण- संगमेश्वर चे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच आपलं चिपळूण चे कार्याध्यक्ष संतोष देशमुख, लोटिस्मा चे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, घरडा उद्योग समूहाचे आर.सी. कुलकर्णी, वक्ते व प्रवचनकार धनंजय चितळे तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय चिपळूणचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
विभा अरविंद ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नामांकित लेखकांच्या पुस्तकांचे दालन चिपळूण मध्ये उपलब्ध होणार आहे. वाचन प्रेमींसाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. विशेषतः वृद्ध महिला तरुण व युवकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने अध्यक्ष प्रकाश उर्फ बापूसाहेब काणे, कार्यवाह विजय कदम व कोषाध्यक्ष विनायक ओक यांनी केले आहे.




