चिपळूण अर्बन बँकेच्या नवीन वास्तूचे गुढीपाडव्याला उदघाटन
सर्वांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन

चिपळूण -(जमालुद्दीन बंदरकर)कोकणात अग्रगण्य असलेली लोकप्रिय चिपळूण अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालय आणि मुख्य शाखेच्या नव्या वास्तूचे उदघाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर १९ मार्च रोजी राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
चिपळूण शहराच्या बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या चिपळूण अर्बन बँकेची प्रगती सातत्याने सुरू असून बँकेची नवीन वास्तू आता लवकरच ग्राहकांच्या सेवेत येणार आहे. गुरुवार दिनांक १९ मार्च रोजी बँकेच्या नव्या वास्तूचे भव्य उदघाटन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. शिवसेना नेते गुहागरचे आमदार भास्कर शेठ जाधव, चिपळूण- संगमेश्वर चे आमदार शेखर निकम, जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, उपाध्यक्ष धनंजय खातू, मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी, संचालिका राधिका पाथरे, संचालक निहार गुडेकर, निलेश भुरण, रहिमान दलवाई, प्रशांत शिरगावकर, समीर जानवळकर, गौरी रेळेकर, राजेश केळसकर, मिलिंद कापडी, रत्नदीप देवळेकर, समीर टाकळे, सुनील खेडेकर, संपदा रेडीज, दिलीप दळवी, विवेक रेळेकर, दिनेश रेडीज, श्रीराम देवळेकर, सतीश खेडेकर, विराज दळी, मधुसूदन माने आदी मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर , सभासद या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
चिपळूण अर्बन बँक अनेक वर्षांपासून ग्राहकांना विश्वासार्ह व दर्जेदार बँकिंग सेवा देत आहे. बँकेची नवीन वास्तू अत्याधुनिक सुविधा व प्रशस्त जागेसह उभारण्यात आली असून ग्राहकांना अधिक सोयीस्कर व जलद सेवा मिळणार आहे. या उद्घाटन सोहळ्या च्या निमित्ताने चिपळूण शहरात उत्साहाचे वातावरण आहे. या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.




